
आनंदऋषीजी महाराजांचे स्वप्न साकारण्यासाठी आनंदऋषीजी हॉस्पिटलची उभारणी करण्यात जाली. या हॉस्पिटलच्या माध्यमातून आरोग्य सेवेची गंगा सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यात येत आहे. अंधारलेल्यांचे जीवन प्रकाशमय करण्याचे कार्य नेत्र विभाग करत आहे. अंधांची वाढती संख्या व नेत्रदान यामध्ये मोठी विषमता असून, अंधांमध्ये ६० टक्के लहान मुले आहेत. नेत्रदान होत नसल्याने, ते नेत्राच्या प्रतिक्षेत आहेत. नेत्रदान चळवळीला गती देण्यासाठी आनंदऋषीजी नेत्रालय विभागात नेत्र पेढीची स्थापना केली जाणार आहे. यामुळे नेत्रदान चळवळीला गती मिळून अनेक अंधाचे जीवनात प्रकाश निर्माण होणार असल्याची भावना डॉ. सुधा कांकरिया यांनी व्यक्त केली.






