या निमित्ताने आनंदऋषीजी नेत्रालय परिवारातर्फे आम्ही आपले मन:पूर्वक आभार मानू इच्छितो. एक ऑप्टोमेट्रिस्ट आणि व्हिजन सेंटरचे संचालक म्हणून आपण समाजाला ‘दृष्टी’ देण्याचे जे महान कार्य करत आहात, ते खरंच कौतुकास्पद आहे. आपल्या या सेवेमुळे आणि समर्पणामुळेच आज अनेक गरजूंचे आयुष्य प्रकाशमान होत आहे. आपण आमच्या ‘Brigade of Sight Givers’ मधील एक महत्त्वाचा दुवा आहात, याचा आम्हाला अभिमान आहे. आपल्या कार्याला आमचा मानाचा मुजरा ! जागतिक ऑप्टोमेट्री दिनाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा !











