ग्लॉकोमा ( काचबिंदू )या “दृष्टी चोरणाऱ्या निःशब्द आजाराबद्दल” जनजागृती करण्यासाठी ८ ते १४ फेब्रुवारी दरम्यान आनंदऋषिजी नेत्रालयात ग्लॉकोमा जनजागृती सप्ताह साजरा करण्यात आला.
या निमित्ताने रुग्ण व नागरिकांसाठी ग्लॉकोमा विषयी मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले. नेत्रालयातील पूर्णवेळ ग्लॉकोमा तज्ज्ञ डॉ. संदीप राणे व डॉ. मिसबह शेख यांनी ग्लॉकोमाची वेळेवर तपासणी व नियमित फॉलोअपचे महत्त्व समजावून सांगितले. वेळेत निदान झाल्यास ग्लॉकोमामुळे होणारे दृष्टी नुकसान नियंत्रित करता येते, असे त्यांनी सांगितले.
🔬 ग्लॉकोमा तपासणीसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध :
- Zeiss RNFL OCT
- Pachymetry
- Perimetry (Visual Field Test)
💉 YAG Capsulotomy सारखे OPD आधारित उपचार उपलब्ध.
🏥 ग्लॉकोमावरील सर्व शस्त्रक्रिया आयुष्मान भारत योजनेअंतर्गत उपलब्ध.
📞 अधिक माहितीसाठी संपर्क : 8686401515
आपली दृष्टी सुरक्षित ठेवा – नियमित डोळ्यांची तपासणी करा.





